मुंबई: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची तुफान खरेदी झाल्याने सेन्सेक्स ८०० अंकांनी वाढून ८१,८०० च्या पार पोहोचला. तर निफ्टी २५,१५० वर बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या नवीन पतधोरणामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.